हजरत सय्यद मख्तूम वली दर्गा उरुसाला प्रारंभ
इचलकरंजी :
शहरातील गावभाग परिसरातील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद मख्तूम वली दर्ग्याच्या वार्षिक उरुसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे दर्ग्यात मंडप उभारून उरुसाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी ४ ते १० ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरुस कमिटीचे अध्यक्ष अयतब मुजावर यांनी दिली.
उरुसानिमित्त ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता संदीप देसाई व सागर करडे यांचा शहनाई वादनाचा कार्यक्रम, त्यानंतर लंगरखाना (महाप्रसाद) आणि रात्री ९ वाजता संदल (गंधलेपन) होणार आहे. ८ ऑगस्ट रोजी भर उरुस असून सकाळी विविध स्पर्धा, सायंकाळी मान्यवरांचा सत्कार व बक्षीस वितरण आणि सायंकाळी ६.१५ वाजता राजस्थान-जयपूरचे प्रसिद्ध कव्वाल सरफराज साबरी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी हिंदू-मुस्लिम भाविकांचा नैवेद्य होणार आहे.
उरुसानिमित्त दर्गा व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यावेळी मक्तुम मुजावर, बादशाह मुजावर, मौला मुजावर, कादिर मुजावर, बाळू मुजावर, अरबाज खतीब, लुकमान समडोळे, इनायत मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उरुस यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष साद सनदी, खजिनदार सुबहान मुजावर, सचिव मुजफ्फर शेख व सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





