ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहायक संचालक (नगररचना) विजय फुलपगारे, सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, सहायक कर संकलन अधिकारी दीपक खोत, क्रीडा अधिकारी संजय शेटे तसेच संदीप जोशी, सदाशिव जाधव, राजाराम यादव, अजय सुतार, सचिन शेडबाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करताना सभापती सतीश मुळीक,सुषमा शिंदे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा