ICHMH51NEWS.IN
9921600800

डॉ.डी. वाय.पाटील हे आदर्श, कृतिशील नेतृत्व होते -प्रसाद कुलकर्णी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ.डी. वाय.पाटील हे आदर्श, कृतिशील नेतृत्व होते -प्रसाद कुलकर्णी

माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील हे वयाच्या ९१ व्या वर्षी कालवश झाले.१९३५ साली जन्मलेले डॉ.डी. वाय.पाटील यांच्या उमलत्या पण कळत्या वयात भारत स्वतंत्र झाला होता. नवभारताच्या निर्मितीत आपणही योगदान दिले पाहिजे अशी खूणगाठ त्यांनी मनात बांधली.त्यानुसार आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरीव स्वरूपाचे योगदान दिले यात शंका नाही.त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सामाजिक ,आरोग्य, राजकीय अशा विविध क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व गमावले आहे.

 

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी कोल्हापूरचे महापौर तर ३२व्या वर्षी पन्हाळा मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून जाणारे डॉ. डी. वाय. पाटील हे अतिशय आगळे वेगळे नेतृत्व होते.अनेकांच्या राजकारणाची नीट सुरुवातही होत नाही त्या वयात म्हणजे वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. १९८३ साली वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी शिक्षणक्षेत्रात प्रवेश करून मुंबई येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर आजअखेर त्यांनी डॉ. डी वाय पाटील शिक्षण समूहाचा ज्या पद्धतीने विस्तार केलेला आहे तो स्तिमित करणारा आहे.१९९१ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.२००९ ते २०१४ या काळात त्यांनी त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे म्हणूनही काम पाहिले होते. हाती घेतलेले काम उत्तम पद्धतीने तडीला नेण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी, त्याचा सतत पाठपुरावा करण्याची तयारी आणि उभारणीचा आनंद या क्रमाने त्यांनी केलेले बुलंद स्वरूपाचे कार्यकर्तृत्व लाखो लोकांना शिक्षण व आरोग्य देऊ शकले हे त्यांचे काम अतिशय महान स्वरूपाचे आहे.

 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा