कन्या महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
इचलकरंजी : प्रतिनिधी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात संस्थेच्या सचिव स्वर्गीय शुभांगीताई गावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिला सबलीकरण विभाग, एनसीसी आणि महालॅब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी तसेच हातकणंगले तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दातार, डॉ. पोळ आणि डॉ. खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात दीडशेहून अधिक विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन महिला सबलीकरण विभागप्रमुख प्रा. संगीता पाटील आणि एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.
आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




