‘मेरा युवा भारत’ स्पर्धेत कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
इचलकरंजी : प्रतिनिधी
मेरा युवा भारत (माय भारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि सीएसआयबीईआर इन्स्टिट्यूट, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत विविध स्पर्धांमध्ये श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत आणि विभागीय संचालक प्रकाश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धांमध्ये कु. वीणा पाटील, कु. वेदिका पाटील, कु. शिवानी निषाद तसेच बी.कॉम. प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी घोषवाक्य लेखन, नशामुक्ती गीत रचना, चित्रकला आदी स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना वाणिज्य विभागप्रमुख प्रा. प्रियांका साळोखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




