ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्याणकारी योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी मला साथ द्या- राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्याणकारी योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी मला साथ द्या- राहुल आवाडे

शहापूर
केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारने राज्याच्या विकासाला गती दिली. गतीमान सरकारमुळे विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने तर महिलांना आर्थिक बळ दिले. अशा योजना कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी मतदारांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे रहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर येथे जाधव हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्याप्रसंगी राहुल आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले होत्या. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी, वस्त्रनगरीच्या विकासात आवाडे परिवाराचे योगदान मोलाचे आहे. विशेषत: वस्त्रोद्योगासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नाने आज इचलकरंजीचे नांव जागतिक पटलावर उमटले आहे. त्याचबरोबर मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. तोच वारसा राहुल आवाडे निश्‍चितपणे अखंडीतपणे सुरु ठेवतील. शहरातील प्रलंबित सर्वच प्रश्‍न ते हिरिरीने तडीस नेतील. त्यासाठी सर्वांनी राहुल आवाडे यांना मतरुपी आशिर्वाद देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी मिश्रीलाल जाजू, भाजप शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, चंद्रकांत पाटील, अहमद मुजावर, सौ. संगीता नरंदे, वृषभ जैन, भाऊसो आवळे, दादासो भाटले, सचिन हेरवाडे, रणजीत आनुसे, सतीश पंडित, संतोष कांदेकर, राजू कबाडे, रमेश पाटील, किसन शिंदे, शिवदीप बंडगर, सौ. पूनम जाधव, सौ. शोभा भाट, सौ. अश्‍विनी कुबडगे, धोंडीराम जावळे, पांडुरंग सोलगे, शितल अमन्नावर, रविंद्र चव्हाण, के. के. कांबळे, रवि मिणेकर, पांडुरंग सोलगे, सचिन पोवार, कृष्णा सातपुते, पंकज कांबळे, अरुण केसरे, समीर मुल्ला, आनंदा दोपारे, अक्षय भाट, इम्रान हावेरी, राजेंद्र आरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा