जैन समाज राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहिल : संदीप भंडारी
इचलकरंजी –
राज्यातील महायुती सरकारने सर्वच समाजाला न्याय दिला आहे. जैन समाजासाठी स्वतंत्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधला जात असून ही विकासगंगा अशीच अविरत ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना सर्वांनी विक्रमी मताधिक्यांनी विजयी करुया, असे आवाहन भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी केले. यावेळी त्यांनी जैन समाजासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना, त्यांचा समाजाला झालेला लाभ याबद्दलही विस्तृत माहिती दिली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जैन समाज कार्यकर्ता संवाद बैठक झाली.यावेळी राहुल आवाडे यांनी, मी माझी उमेदवारी चांगल्या कार्यासाठी, सर्व समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणेन. आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर या दोन दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सातत्याने प्रयत्नशी राहिन. सर्वसामान्यांचे सरकार असलेल्या महायुतीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी मला बळ द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी मतदारसंघाच्या निरिक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले, चंद्रकांत पाटील, प्रितम बोरा, अभय बाबेल, अशोक सालेचा, दिलीप मुथा, महावीर जैन, जतन मेहता, प्रितम गुगळे यांनी आपल्या मनोगतात प्रचार नियोजनाबद्दल सर्वांना माहिती देत राहुल आवाडे यांना सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवूया असे आवाहन केले. यावेळी सामाजिक न्याय एवं बाल अधिकार परिषद नवीदिल्लीच्या महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संदीप भंडारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महावीर जैन, प्रदेश सचिव प्रितम बोरा, कार्यकारणी सदस्य अशोक सालेचा, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ प्रमुख अभय बाबेल, भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले, शहाजी भोसले, कोल्हापूर अध्यक्ष प्रितेश कर्नावट, अमित वोरा, संघटन प्रमुख प्रशांत गौडाजे, विकास बनसोडे आदी मान्यवर बरोबर आचार्यश्री आनंद युवा मंच, भ. महावीर जन्म कल्याणक, जैन समाजाचे सदस्य उपस्थित होते. स्वागत आणि आभार प्रदर्शन प्रितम बोरा व अभय बाबेल यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







