कावीळ साथ नसली तरी सतर्क राहण्याचे जि.प.साथरोग आरोग्य अधिकारी यांचे आवाहन.
इचलकरंजी –
काविळ सदृश्य साथीच्या संदर्भात प्राप्त माहितीवरुन आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आवश्यक उपाययोजना व माहिती संदर्भात जिल्हा परिषद आरोग्याधिकारी यांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचगंगा नदीकाठावरील काही गावात निर्माण झालेली काविळ सदृश्य साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कजिल्हा परिषद साथरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी पथकाने या साथीच्या रुग्णांबाबत माहिती घेता इचलकरंजी शहर व परिसरात काविळ अथवा काविळ सदृश्य साथ नसल्याने नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन डॉ. सुशांत रेवडेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.
पंचगंगा नदीकाठावरील काही गावांसह इचलकरंजी शहर परिसरात काविळ सदृश्य साथीचे रुग्ण असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आवाडे यांना मिळाली होती. या संदर्भात त्यांनी तातडीने हालचाली करत संबंधित गावे व इचलकरंजीत तातडीने सर्व्हे करुन असे रुग्ण आढळल्यास आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा परिषदेकडील वैद्यकिय पथकाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हा परिषद साथरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, साथरोग तज्ञ डॉ. संतोष तावशी, आरोग्य सेवक प्रविण मुळीक, हातकणंगले तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसाद दातार, आरोग्यसेवक संजय पुजारी, राहूल शेळके आदींचा पथकात समावेश होता. पथकाने आवश्यक ती माहिती घेत रुग्णालयात पाहणी केली. काविळ सदृश्य रुग्णांच्या तपासण्या केल्या. परंतु त्यामध्ये काही सकारात्मक आढळले नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क राहण्यासह गरज भासल्यास आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी रुग्णालयातील निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. संदीप मिरजकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके यांच्यासह वैद्यकिय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800