बनावट कागदपत्राद्वारे संगनमताने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी वकीलासह ९ जणावर गुन्हा.
इचलकरंजी
बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक करत कर्ज मंजुर करून घेतल्याबाबत इचलकरंजी येथील अँड दिगंबर शंकरराव निमणकर, वय ७५ वर्षे, व्यवसाय वकीली व्यवसाय,१६/७७, राजाराम रोड, भाजप पक्ष कार्यालयाजवळ, यांच्या फिर्यादीनुसार मारुती दत्तोबा निमणकर,मंगल टेक्सटाईल्स,प्रकाश मारुती निमणकर प्रो.प्रा.प्रकाश व्हीवींग मिल्स,राजेश मारुती निमणकर प्रो प्रा.मे.मारुती टेक्सटाईल्स व राजेश टेक्सटाईल्स. ऋषिकेश राजेश निमणकर,प्रो,प्रा.ऋषिकेश टेक्सटाईल्स,अभिषेक राजेश निमणकर प्रो.प्रा.अभिषेक टेक्सटाईल्स सर्व रा.१६/७८ राजाराम रोड, इचलकरंजी, अॅडव्होकेट श्री. एस. एन. मुदगल रा.बावणे गल्ली,दत्तात्रय पी म्हातुगडे रा.कागवाडे मळा,इचलकरंजी तामिळनाड मर्कन्टाईल बँकेचे तत्कालीन मॅनेंजर श्री.जी. गणेशकुमार राहणार शिवाकाशी ब्रँच, विरुध्दानगर व तामीळनाड मर्कन्टाईल व तामीळनाड मर्कन्टाईल बँकेचे सध्याचे मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम राहणार फ्लॅट नं. 3, ए बिल्डींग, निसर्ग रेसिडेन्सी, जुना चंदूर रोड, इचलकरंजी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी शहरातील राजाराम रोड येथील अँड.दिगंबर शंकरराव निमणकर व मारुती दत्तोबा निमणकर यांची संयुक्त मालकी असलेली मिळकत आहे.सदर मिळकतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू असून अंतिम आदेश प्रलंबित असताना 27/06/2022 ते 18/07/2024 रोजी या कालावधीत वेळोवेळी इचलकरजी ता हातकणंगले येथील फिर्यादी यांचे मालकी व वहीवाटीच्या मिळकत सिटी सर्व्हे क्र. 15864/4, 15866, व सिटी सर्व्हे क्र. 15866/1 ते 9 बाबत बनावट कागदपत्रे सादर करून तामिळनाड मर्कन्टाईल बँकेत १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्जप्रकरण मंजूर करून रक्कम उचलली व दिगंबर निमणकर यांच्या मिळकतीवर बेकायदेशीररित्या बोजा चढवून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पो नि सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो सई उर्मिला खोत करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800