सुवर्णकार असोसिएशनतर्फे व्यवसायवाढीसाठी सेमिनार संपन्न.
इचलकरंजी
स्टायलस इंडिया, पुणे व इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशन तर्फे बदलत्या काळाप्रमाणे स्वतः मध्ये, व्यवसायामध्ये नवनवीन बदल घडवणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शनपर सेमिनार चे आयोजन केले होते.
प्रास्ताविक श्री. नंदकुमार वेदपाठक यांनी केले. मुख्य मार्गदर्शन करताना स्टायलस इंडिया थे श्री. रणजित जी शिंदे यांनी स्टायलस इंडिया कंपनीद्वारे आयोजित UGJIS, 2025 पुणे. या आगामी ज्वेलरी प्रदर्शन बद्दल विस्तृत माहिती दिली. या प्रदर्शन मधे प्लेन गोल्ड ज्वेलरी, अँटीक गोल्ड ज्वेलरी, कास्टींग ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, लाईट वेट ज्वेलरी, सिल्व्हर ज्वेलरी, सिल्व्हर पुजा आपटम, तसेच मशिनरी प्रत्यक्ष पहावयास, हाताळण्यास मिळणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागांतील व्यापारीवर्ग एकाच छताखाली एकत्र येऊन त्यांचेकडील विविध कलाकुसरीचे दागिने प्रत्यक्ष बघायला मिळतात. नवीन व्यापारीवर्गाची यानिमित्ताने ओळख होते.
अशा ज्वेलरी प्रदर्शनना भेटी दिल्याने, सराफ सुवर्णकार यांना आपल्या दुकानात व्यवसायात नेमके काय बदल करवित.? जेणेकरू व्यवसाय अधिक वाढेल याची जाणीव होते. त्यामूळे असे ज्वेलरी प्रदर्शन आवर्जून पाहण्यास यावे याचे निमंत्रण त्यांनी सर्वांना दिले. यानंतर झालेल्या चर्चात्मक संभाषणामध्ये. श्री रणजित शिंदे यांनी सर्वांना आपल्यामध्ये व आपल्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल करण्याचे आवाहन केले. व्यवसायासमोरील आव्हानांना सामोरे जायला शिका. प्रश्नांमध्ये गुरफटून न बसता त्यावर सोल्युशन उत्तर काढण्याचा प्रयत्न करावा. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणाव्यात पण हे करताना आपले नुकसान देखील करून घेऊ नये. ग्राहकांना चांगला व योग्य भावात दागिने विक्री करणे हेच ध्येय ठेवावे. आपले व आपल्या व्यवसायाचे दिसणे हे खूप महत्त्वाचे आहे व्यवसायाच्या ठिकाणी बोर्ड, रोजचे बाजारभाव, डिसप्ले, योग्य मालाची मांडणी, प्रकाशयोजना, ग्राहकांचे स्वागत त्यांचे आदरातिथ्य, चांगले सुस्वभावी बोलणे… आदी सहज सोप्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल केल्यास यश नक्कीच मिळेल याचा आत्मविश्वास त्यांनी सर्वांना दिला. दुकानातील भांडवल वाढी साठी शासनाच्या विविध योजना अस्तित्वात आहेत, पण आपण तिकडे जात च नाही. अल्पव्याज दारातील अशा कर्जाचा अर्थसहाय्याचा निश्चितच लाभा करून घ्या. भांडवल वाढवा, छोटे छोटे बदल करा व व्यवसाय नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे उद्दीष्ठ पूर्ण करावे. श्री. रणजित शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर, अध्यक्षिय भाषणात श्री. सचिन देवरुखकर यांनी UGJ15 पुणे ज्वेलरी प्रदर्शनास सर्वांनी भेट देण्याचे आवाहन केले. सद्यस्थित व्यवसायासमोरील आव्हाने व त्याअनुषंगाने खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री रणजित शिंदे यांनी केलेल्या परख मार्गदशनाबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यानंतर श्री. रणजित शिंदे व श्री. श्रीकुमार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळेस श्री. राजू कदम उपाध्यक्ष, जतिन पोतदार सेक्रेटरी, सचिन कापसे खजिनदार, उदय लोले, सुहास आवळकर, सुनिल चौगले, संतोष भाटले, इम्तियाज शेख, महेश साळवी. नितीन चौगुले, सचिन पोतदार आदी संचालक उपस्थित. होते. या सेमिनार चा लाभ असो. चे सदस्य तसेच चंदूर, रुई, रुकडी, कुंभोज, हातकणंगले, हुपरी, बेडकीहाळ, लाट, कोरोची, तारदाळ, खोतवाडी येथील सराफ व सुवर्णकार बांधवानी घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800