मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी शिल्लक पदार्थ उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई -अति.आयुक्त सुषमा शिंदे
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणेच्या कामाचा तिसरा टप्पा सुरू करणेत आलेला आहे. तथापि शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चिकन सिक्स्टी फाईव्ह , बिर्याणी अशा मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आलेने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी आज गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी आपल्या दालनात शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिल्लक रहात असलेले पदार्थ आपल्या जवळच्या डस्ट बीन मध्ये जमा करुन महानगरपालिका प्रशासनाकडून रात्री उपलब्ध करून देणेत आलेल्या घंटागाडी मध्येच टाकावेत अन्यत्र कुठेही टाकु नयेत जेणेकरून त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर होणार नाही याची दक्षता घ्यावी. याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर करणेत येवु नये असे आदेश दिलेले आहेत.तथापि ज्या व्यावसायिकांकडून या आदेशाचे उल्लंघन केलेचे निदर्शनास येईल.त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेचे आदेश यावेळी देणेत आले आहेत.
या बैठकीस मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील,
मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, मंगेश दुरुगकर, प्रभाग अधिकारी स्वप्निल बुचडे, प्रशांत आरगे,गौस जमादार यांचेसह शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेते उपस्थित होते.
निर्णयाचे स्वागत अंमलबजावणीची अपेक्षा
अति आयुक्त सुषमा शिंदे यांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाचे शहरवासियांनी स्वागत केले असुन अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







