ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील विक्रमनगरमध्ये गारमेंट गोदामाला भीषण आग – १ कोटी ३२ लाखाचे नुकसान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील विक्रमनगरमध्ये गारमेंट गोदामाला भीषण आग – १ कोटी ३२ लाखाचे नुकसान

इचलकरंजी:
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत गारमेंट व्यवसायाच्या गोदामास  विक्रमनगर भागात भीषण आग लागल्याची घटना घडली. गौतम जब्बारसिंह पुरोहित यांच्या गारमेंट व्यवसायाच्या गोदामास लागलेल्या आगीमुळे सुमारे १ कोटी ३२ लाखाचे  नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही घटना जवाहर सायझिंग समोर, विश्वमित्र पतसंस्थेजवळ घडली. आगीत तयार झालेला माल, महागडी मशिनरी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्पर मदत कार्य करत बराचसा माल बाहेर काढण्यात यश मिळवले.
अग्निशमन दलाची एकच गाडी सुरू असल्याने शहरवासियांची गैरसोय होऊ लागली आहे.आग विझवण्यासाठी स्थानिक अग्निशमन यंत्रणा कमी पडल्याने हुपरी, हातकणंगले, पंचगंगा कारखाना येथील गाड्या दुरुस्तीस गेल्याने अखेर कुरुंदवाड नगरपालिकेची एक गाडी मिळाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, तसेच महावितरणचे अधिकारी लोटके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा