श्री १००८ भ.शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट शहापूर, मंदिराचा स्लॅब मुहूर्त संपन्न
शहापूर-
दि.१० मार्च २०२५ रोजी मंदिराच्या मानस्तंभ शीलान्यास पाया खुदाई व पायाभरणी मुहूर्त त्याचबरोबर नूतन मंदिराचे प्रथम स्लॅब मुहूर्त विधिवत संपन्न झाला,
शांतिनाथ भगवंतांचे पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा याठिकाणी संपन्न झाला त्याचबरोबर मंडूकविधान होमहवन यंत्रशुद्धी वास्तुशुद्धी करण्यात आली
या कार्यक्रमासाठी सौधर्मइंद्र व मानस्तंभ शीलान्यास विधी पायाखुदाई श्रीमती हौसाबाई जिन्नाप्पा मोळेकर श्री.व सौ.शांता महावीर मोळेकर त्यांच्या वतीने करण्यात आले तसेच इतर सर्व होमहवन, व मानस्तंभ पायाभरणी साठी इंद्र म्हणून श्री.व सौ.त्रिशला सचिन अथणी, श्री.व सौ.अर्चना विशाल बम्मन्नावर,श्री.व सौ.स्नेहल शितल बोरगावे,श्री.व सौ.सुनीता राजेंद्र बम्मन्नावर, यांच्या हस्ते करणेत आले.
नूतन मंदिराचे स्लॅबचा शुभारंभ धर्मानुरागी कुंथीलालजी पाटणी, चंद्रकांतजी पाटील, संजयजी पाटणी, दिलीप चौगुले, शेषराजजी पाटणी, रमेश पाटील, सचिन राणे, किसन शिंदे, रणजीत अनुसे ,संजय मगदूम ,विजय गिरमल, सुकुमार पोते ,पांडुरंग सोलगे, इंजिनिअर बाहुबली पाटील, अशोक चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रकाश चौगुले, शितल पाटील, सांगले गुरुजी, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती अतिशय आनंदमय व भक्तिमय वातावरणामध्ये सानंद संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी शांतिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल बम्मन्नावर सेक्रेटरी अनंत बोरगावे खजिनदार मोहन बोरगावे मंदिराचे ट्रस्टी संजय कांचनकोटी, सुमित बोरगावे अविनाश पाटील, सागर बोरगावे,इंदुमती कुडचे, शशिकला व्हनवाडे,अरुण बम्मन्नावर, स्वप्निल बोरगावे, अजित बोरगावे, शिवराज पाटील,श्रीकांत काणे,दयानंद काणे,आकाश अथने, अभिषेक बम्मन्नावर
वीर सेवा दलाचे संघनायक अनिल मुरगुंडे पृथ्वीराज बम्मन्नावर वीर महिला मंडळाचे संघनायिका भारता मोळेकर,दीपा मुरगुंडे तसेच रमेश बम्मन्नावर, महावीर बुगटे,गांधीलाल बोरगावे,विशाल काणे,आप्पासो मोळेकर, भालचंद्र मोळेकर,राकेश पाटील,संजय टोणे, जगन्नाथ कांचनकोटी,राजश्री बोरगावे श्रीलेखा पाटील, नंदा मुके, आंबिका पाटील,प्रियंका बम्मन्नावर,मेघा कांचनकोटी, शुभांगी सांगले उपस्थित होते.या पूर्ण कार्यक्रमासाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून लाभलेले *पंडित श्री प्रवीण उपाध्ये साजणी (हिंगणगाव), संजीव उपाध्ये (हेरले),स्थानिक पंडित नेमिनाथ उपाध्ये शहापूर* उपस्थित होते.
अतिशय धार्मिक वातावरणामध्ये संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये जैन समाजातील सर्व श्रावक श्राविका यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







