ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ब्राह्मण सभेतर्फे परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ब्राह्मण सभेतर्फे परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन.

इचलकरंजी:
येथील ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचे वतीने मंगळवार दि.२९ एप्रिल रोजीपरशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनां मार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले असुन  सकाळच्या सत्रात  पूजा व पवमान अभिषेक सोहळा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर,धाकटा वाडा येथे वेदशास्र संपन्न ब्रह्मवृंन्दांच्या मंत्रोच्यारात संपन्न होणार असुन सामुदायिक श्री राम रक्षा पठण केले जाणार आहे. संध्याकाळी ५ वा गाँधी पुतळा ते श्रीराम मंदिर गावभाग पर्यन्त पारंपारिक पद्धतीने समाजातील आबाल महिलांसह तरुण -तरुणाई जेष्ठ नागरीक ज्ञाती बंन्धु- भगीनींसह शोभायात्रा काढणेत येणार असुन यामध्ये दांडपट्टा,भगवान श्री परशुराम पालखीचा समावेश पारंपारीक वाद्यांसह असुन याची सांगता श्रीराम मंदिर येथे होणार आहे.त्यानंतर मंदिरात देवाचा पाळणा,आरती तसेच ज्ञाती- भगिनींसाठी हळदी-कुंकू व प्रसादाचे आयोजन केले आहे. पारंपारिक आणि घरगुती पद्धतीने परशुराम जन्मोत्सवा चा सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी  ब्राह्मण सभा व ब्राह्मण समाजने ज्ञाती-बंन्धु भगिनीसाठी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा