शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न.सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना शिष्यवृत्ती प्रश्नसंच वितरण
इचलकरंजी.
कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उर्दू विस्तार अधिकारी मुसा सुतार यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम जयसिंगपूर येथील ईदगाह हॉल येथे संपन्न झाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वतीने सदरचा सेवा निवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी संदर्भित प्रश्नसंच विस्तार अधिकारी मुसा सुतार यांनी देऊन आपली १९ वर्षाची सेवेची उतराई फेडली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना इम्तियाज म्हैशाळे यांनी केली, सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेतील प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये जिल्ह्यात क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, एस. के. यादव (उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर),सौ. भारती कोळी (गटशिक्षणाधिकारी शिरोळ) ,जे. टी .पाटील, अजयकुमार बिरंगे,सौ नम्रता गुरसाळे,अनिल ओमासे, दिपक कामत(शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर) उर्दू केंद्रप्रमुख रियाज चौगुले ,आयुब पटेल व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील उर्दू शिक्षक उपस्थित होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सदर प्रज्ञाशोध प्रश्नपत्रिका संच याचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी विस्ताराधिकारी मुसा सुतार यांचे कार्याचे कौतुक केले तसेच निस्वार्थी जिल्हा परिषदची सेवा केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला, प्रमुख वक्त्यानी विस्ताराधिकारी मुसा सुतार यांच्या कार्याचा आढावा घेतला व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ शेख व यासीन शिरगुपी यांनी केले तसेच शेवटी आभार निसार कनवाडे यांनी व्यक्त केले.
- मुसा सुतार यांचा सत्कार करत असताना आ.राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवर.
- प्रश्नसंच प्रकाशित करताना प्रमुख मान्यवर.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








