रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन इचलकरंजी मध्ये आर.टी.एस स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण संपन्न
इचलकरंजी
आज रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे वतीने प्रति वर्षाप्रमाणे घेण्यात आलेल्या रवींद्रनाथ प्रज्ञा शोध परीक्षेचा (आर.टी.एस)बक्षीस वितरण समारंभ घोरपडे नाट्यगृहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती मा महेश पाटीलसो,इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा प्रकाश मोरबाळेसो,इचलकरंजी भाजपा शहराध्यक्ष मा अमृतमामा भोसलेसो उपस्थित होते.
याप्रसंगी महेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्वसामान्य कुटुंबातील विदयार्थ्यांना अत्यंत उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणून शाळेचा गौरव केला.त्याचप्रमाणे अमृतमामा भोसले व प्रकाश मोरबाळे यांनी शाळेचे कौतुक करून भविष्यात शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमामध्ये आर.टी.एस.परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले यावेळी केंद्रमुख्याध्यापक आदीप पाटील,मुख्याध्यापिका अलका शेलार ,शिक्षक समिती शहराध्यक्ष संजय देमाण्णा,शिक्षक संघ शहर अध्यक्ष किरण दिवटे ,सर्व आजी माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,सर्व पालक व शिक्षक स्टाफ उपस्थित होता
शेवटी आभार श्री अजित शेट्टी यांनी मानले.
- पारितोषिक वितरण करताना महेश पाटील,अमृत भोसले,प्रकाश मोरबाळे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







