केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची सत्यराज इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कला भेट-वस्त्रोद्योग मधील एक आदर्श पार्क म्हणून गौरवले
इचलकरंजी –
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचा इचलकरंजी भेटीचे नियोजन ठरले होते सदर नियोजन मधून सत्यराज इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क,शिवणाकवाडी यांचा समावेश होता.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह,महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,खासदार धर्यशील माने,आमदार डॉ.राहुल आवाडे, केंद्रीय वस्त्रोद्योग समितीचे संचालक अनिल कुमार ,आमदार शैलेश कुमार,व केंद्र व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्रालयातील अधिकारी यांची संयुक्त कमिटी सत्यराज पार्क मधील प्रियलक्ष्मी टेक्सटाईल, मणियार टेक्सटाईल, मर्दा सायझिंग या युनिटना भेटी दिल्या.
सर्व मान्यवरांचे स्वागत सत्यराज इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क चे चेअरमन कैश बागवान यांनी केले.तसेच अरुकुमार बाहेती,मणियार व मर्दा यांनी आपल्या युनिट ची सविस्तर माहिती आलेल्या शिष्टमंडळाला दिली व वस्त्रोद्योग मधील ब्रँड कसे झालो याचा लेखाजोखा मांडला.पार्क मधील सोयीसुविधा,रस्ते,कामगार हॉस्टेल,मध्यवर्ती नियंत्रण कक्ष,हे सर्व गोष्ठी पाहून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह भारावून गेले त्याने आपल्या मनोगतात सांगितले की भारतामधील वस्त्रोद्योग मध्ये एक आदर्श पार्क म्हणून सत्यराजचा नामोउल्लेख केला तसेच भविष्यात वस्त्रोद्योग मधील येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन सर्व यंत्रमाग धारकांना दिले.
सदर दौरा यशस्वी करण्यासाठी पार्क मधील बाहेती परिवार,मणियार परिवार,मर्दा परिवार व सर्व संचालक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी इम्रान मकानदार,हिदायत खतीब,इम्तियाजम्हैशाळे, कलंदर बागवान, अशोक,अनिल, आयुब मुजावर,इम्रान गैबान,यांनी प्रयत्न केले.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उद्योगपती कैश बागवान यांच्यासमवेत सत्यराज इन्ट्रीग्रेटेड पार्क मध्ये भेट दिली व माहिती घेतली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








