ICHMH51NEWS.IN
9921600800

नॅशनल हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी दहावी व बारावीचा १००% निकाल,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नॅशनल हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी दहावी व बारावीचा १००% निकाल,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

इचलकरंजी
नॅशनल हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथील इयत्ता दहावी व बारावीचा निकाल -2025 नुकताच जाहीर झाला असून, सालाबाद प्रमाणे 100% निकालाची उज्ज्वल परंपरा यशस्वीरित्या टिकवली आहे.
इयत्ता १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे 1) कु. मुबश्शिरा सिकंदर मुजावर 82.17% 2) कु. आफिया समीर गवंडी 78.17% 3) कु. फिजा इम्तियाज मोमीन – 77.17% इयत्ता १० वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे 1. कु. अफिफा मुबीन लुकुड -91% 2) कु. तबस्सुम म.शरीफ चांदकोटी 90.80% 3) कु. मुबशिरा फिरोज चांदकोटी – 90.20% 4) कु. तंजीला अस्लम मुजावर 90.00% 5) कु. अजीजा अल्ताफ मुल्ला 89.60%
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष धोंडीलाल शिरगावे, उपाध्यक्ष मिरासो समडोळे, सचिव अहमद मुजावर, सहसचिव रशीद गवंडी, खजिनदार नजीर खलिफा, संचालक मन्सूर मुजावर, लतीफ  गैबान,  मुबारक खान सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक इरफान अन्सारी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष धोंडीलाल  शिरगावे, अहमद मुजावर, नजीर खलिफा यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांकडून शाळेतील विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक व शिक्षकांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आजम मुन्शी सर यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे पदाधिकरी व शिक्षक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा