तुर्की व अजरबैजान या देशांवर उद्योजकांनी बहिष्कार टाकावा – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन
इचलकरंजी
कश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. या युद्धामध्ये पाकिस्तानला तुर्की व अजरबैजान हे दोन देशांनी मदत केली. यापैकी तुर्कीला कोरोना काळात व त्यानंतर झालेल्या भुकंपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारताने मदतीचा हात दिला होता. कोरोना काळात औषधे, पी.पी.ई. किट, मास्क इ. त्वरीत भारताने पाठविले होते. त्यानंतर तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपावेळी अनेक प्रकारचे साहित्य घेऊन भारतीय विमाने तुर्कीमध्ये पोहोचली होती. जगात सर्वप्रथम एवढी मदत करूनही या देशांनी भारताविरोधी पाकिस्तानला या युद्धात मदत केल्याबद्दल दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने सर्व यंत्रमागधारक व कापड उद्योजकांना आवाहन केले आहे की, त्यांनी तुर्की व अजरबैजान यांच्याबरोबर व्यापार करू नये. त्याचबरोबर तुर्कीतून मोठ्या प्रमाणात मशिनरी भारतामध्ये आयात होत आहे. ती सुद्धा बंद करणेत यावी. ज्यांनी असे करार केले असतील त्यांनी ते त्वरीत रद्द करून त्यांना पाकिस्तानला मदत केल्याचा हा दुष्परीणाम आहे हे जाणवून द्यावे. त्याचबरोबर तुर्की व अजरबैजान येथे भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात ते त्यांनी रद्द करावे. व यापुढे भारतीय नागरिकांनी तुर्की व अजरबैजान येथे पर्यटन करू नये असे आवाहन केलेले आहे.
भारत विरोधी दहशतवादी हल्ला झालेनंतरच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील फक्त दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. व त्यानंतर पुन्हा आमची कारवाई करणेची कोणतीही भावना नाही असे सांगूनही पाकिस्तानने भारताच्या नागरीवस्ती, धार्मीक स्थळे व सैन्य ठिकाणांवर हल्ला चढविला व यामध्ये कृतघ्न तुर्की व अजरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानची साथ दिली याबद्दल या दोन देशांचा निषेध करून त्यांना वाळीत टाकणेत यावे असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800