ICHMH51NEWS.IN
9921600800

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सायकलस्वार विद्यार्थिनी बेसमेंटमध्ये पडली; गंभीर दुखापत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सायकलस्वार विद्यार्थिनी बेसमेंटमध्ये पडली; गंभीर दुखापत

इचलकरंजी

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये १० वी मध्ये शिकणारी व राष्ट्रीय खो-खो खेळाडू असलेली कु. नंदिनी विजय वाईंगडे ही आज सकाळी सायकलवरून सरावासाठी जात असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला.

घाबरून पळताना, नंदिनीची सायकल पीएनजी जवळील इमारतीच्या बेसमेंटमध्ये कोसळली. या अपघातात तिच्या दोन्ही हातांना गंभीर मार बसला असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

नंदिनीला तातडीने डॉ. चव्हाण यांच्या खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले असून, सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांत संताप उसळला आहे. स्थानिकांनी नसबंदी मोहिमा वेळेवर न राबवल्याचा आरोप केला असून, चिकन सिक्सटी फाईव्ह विक्रेत्यांमुळे कुत्री मांसाच्या वासाने हिंस्त्र झाली असल्याची तक्रार करत पालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.परिसरातील भटक्या कुत्र्यांवर तत्काळ नियंत्रण आणावे,चिकन विक्रेत्यांच्या मोकाट व्यवस्थेवर कारवाई करावीविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा