शिवसेनेच्या तिरंगा रॅलीला इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी पन्हाळा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. प्रत्युत्तरात भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागून ती उध्वस्त केली. भारतीय जवानांनी ऑपरेशन सिदूरने प्रत्युत्तर देत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे कंबरडे मोडलले. भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या पार्श्वभुमीवर आज कोल्हापुर शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने
यांच्या मार्गदर्शनाखालीइचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, आणि शाहूवाडी पन्हाळा याठिकाणी शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.सर्वच ठिकाणी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,
इचलकरंजीत शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे जेष्ठ नगरसेवक महादेव गौड,माजी आरोग्य सभापती रविंद्र लोहार ,माजी नगरसेवक प्रकाश पाटील ,नगरसेवक
इकबाल कलावंत ,लोकनियुक्त सरपंच कोरोची
संतोष भोरे,कोल्हापुर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे,युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख स्नेहांकिता भंडारे,सुषमा भिसे,इचलकरंजी शिवसेना उप शहरप्रमुख विनायक सुर्यवंशी
चेअरमन काकासो माने चॅरिटेबल ट्रस्ट
अमरसिंह माने,संदिप माने यांच्यासह देशभक्त नागरिक शिवसैनिक उपस्थित होते.शिरोळ तालुक्यातील
उपजिल्हाप्रमुख- सतीश मलमे,तालुकाप्रमुख-उदय झुटाळ
उपतालुकाप्रमुख संभाजी गोते, सुरज शहर प्रमुख रतन पडियार, उपशहर प्रमुख राजू भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली,हातकणंगले येथे
उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, माजी आमदार सुजित मिनचेकर तालुकाप्रमुख अजित सुतार, शहर प्रमुख मिथुन जाधव, उपतालुकाप्रमुख महेश माळी, अक्षय मदने यांनी रॅलीचे नेतृत्व केले तर शाहूवाडी पन्हाळा येथील रॅलीत
उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, तालुकाप्रमुख दादासाहेब तावडे, विजयसिंह देसाई, तालुकाप्रमुख विनायक पाटील, तुकाराम चौगुले, आनंदराव पाटील विभाग प्रमुख पांडुरंग निकम ,सचिन जाधव यांच्यासह देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









