ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

इचलकरंजी

इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिरातर्फे विविध साहित्य प्रकारांतील पुरस्कार २०२४ साठी जाहीर झाले आहेत.

इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारसुनीता झाडे यांचा शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या, उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कारडॉ. सविता नायक मोहिते यांचे श्याम बेनेगल: एक व्यक्ती.. एक दिग्दर्शक,उत्कृष्ट कथासंग्रहसंजीवनी बोकील यांचा कवडशांचे फूल,उत्कृष्ट कादंबरीअभिराम भडकमकर यांची सीता,उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृतीशुचिता नांदापूरकर-फडके यांचे रामाच्या पावलांवर पाऊल,उत्कृष्ट ललित गद्यसंतोष आळंजकर यांचे रानभुलीचे दिवस,उत्कृष्ट बालसाहित्यरश्मी गुजराथी यांचे कळीची फजिती,युवा पद्मरत्न पुरस्कारप्रशांत आंबी यांचे बोद,स्थानिक साहित्यिक पुरस्कारचित्कला कुलकर्णी,उत्कृष्ट वाचक पुरस्कारकिरण नाईक यांना जाहीर झालें असून,विशेष उल्लेखनीय पुरस्कार तिथे भेटूया, मित्रा – संकेत म्हात्रे,घेतलंय स्टेअरिंग हाती – पद्मरेखा धनकर,चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे… – चंद्रकांत कुलकर्णी,भालचंद्र नेमाडे साहित्यविचार. डॉ. देवानंद सोनटक्के याना जाहीर झाले आहेत.पुढील वर्षीपासून पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाच्या अध्यक्षा सुषमा दातार आणि संमेलन सचिव डॉ. श्रीवल्लभ मर्दा यांनी दिली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा