ICHMH51NEWS.IN
9921600800

एटीएम फोडून सुमारे सात लाखांची रोकड लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एटीएम फोडून सुमारे सात लाखांची रोकड लंपास

इचलकरंजी:

इचलकरंजी शहरालगत  शिरोळ तालुक्यातील यड्राव फाटा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोड करून सुमारे ६,९५,८०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे २.३० ते ३.१५ या वेळेत घडली.याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी भिकाजी संभाजी निमकर (वय ४४ रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे एफ.एस.एस. कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असून, त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एटीएम मशीनमध्ये १००,२०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे एकूण ६,९५,८०० रुपये इतकी रोख रक्कम होती. चोरट्यांनी मशीन गॅस कटरने कापून फोडले आणि ही संपूर्ण रक्कम लंपास केली.

या प्रकरणाचा तपास पो.नि.सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस हवालदार बांगर यांनी फिर्याद नोंदवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

पाहणी करताना शहापूर पोलीस ठाण्याचे पो.नि. सचिन सुर्यवंशी व कर्मचारी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा