आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर
इचलकरंजी
इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिरातर्फे विविध साहित्य प्रकारांतील पुरस्कार २०२४ साठी जाहीर झाले आहेत.
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार: सुनीता झाडे यांचा शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या, उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार: डॉ. सविता नायक मोहिते यांचे श्याम बेनेगल: एक व्यक्ती.. एक दिग्दर्शक,उत्कृष्ट कथासंग्रह: संजीवनी बोकील यांचा कवडशांचे फूल,उत्कृष्ट कादंबरी: अभिराम भडकमकर यांची सीता,उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती: शुचिता नांदापूरकर-फडके यांचे रामाच्या पावलांवर पाऊल,उत्कृष्ट ललित गद्य: संतोष आळंजकर यांचे रानभुलीचे दिवस,उत्कृष्ट बालसाहित्य: रश्मी गुजराथी यांचे कळीची फजिती,युवा पद्मरत्न पुरस्कार: प्रशांत आंबी यांचे बोद,स्थानिक साहित्यिक पुरस्कार: चित्कला कुलकर्णी,उत्कृष्ट वाचक पुरस्कार: किरण नाईक यांना जाहीर झालें असून,विशेष उल्लेखनीय पुरस्कार तिथे भेटूया, मित्रा – संकेत म्हात्रे,घेतलंय स्टेअरिंग हाती – पद्मरेखा धनकर,चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे… – चंद्रकांत कुलकर्णी,भालचंद्र नेमाडे साहित्यविचार. डॉ. देवानंद सोनटक्के याना जाहीर झाले आहेत.पुढील वर्षीपासून पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाच्या अध्यक्षा सुषमा दातार आणि संमेलन सचिव डॉ. श्रीवल्लभ मर्दा यांनी दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







