इचलकरंजी महानगर पालिकेकडून वारसा हक्काने २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती-सर्व नुतन कर्मचाऱ्यांनी
प्रामाणिकपणे सेवा करावी :-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजी
इचलकरंजी महानगर पालिका आरोग्य विभागाकडे सेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू आहे. या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या महानगरपालिका आरोग्य विभागाकडील काही सफाई कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.
या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या २५ पात्र वारसांना आज आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देणेत आले.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी नियुक्त केलेल्या सर्व नुतन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक पणे काम करुन शहराची सेवा करावी असे आवाहन केले.
याचप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून इचलकरंजी परिसरातील गरजु रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक निधीसाठी आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्राप्त झालेल्या मंजुरी पत्रांचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सहा. आयुक्त विजय राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी सभापती श्रीरंग खवरे, रवी जावळे, यांचेसह सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे लाभार्थी उपस्थित होते.
फोटो- नियुक्तीपत्र वितरित करताना आ.राहुल आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







