बाळ महाराजांच्या वाढदिनी राष्ट्रीय स्वधर्म सेनेची स्थापना
इचलकरंजी:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्गुरु योगी बाळ महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वधर्म सेनेची स्थापना करण्यात आली. यावेळी योगी बाळ महाराज यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच जय श्रीरामसह प्रेरणादायी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी वाढदिवसानिमीत्त राष्ट्रीय स्वधर्म सेनेची स्थापना हा क्षण अविस्मरणीय ठरेल, असे बोलून दाखवले.
संघटनेचे संस्थापक योगी बाळ महाराज यांनी आजपर्यंत आपण इतर पक्ष, संघटना वाढवल्या पण आता कार्यकर्ते, भक्तांना बळ देण्यासाठी राष्ट्रीय स्वधर्म सेनेची स्थापना केल्याचे जाहीर केले. त्यानंतर योगी बाळ महाराज यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे पूजन करुन जय श्रीराम यासह स्फुर्तीदायक, प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.
दरम्यान वाढदिवसानिमीत्त योगी बाळ महाराज यांनी सद्गुरु महादबा पाटील महाराज यांच्या मुर्तीवर अभिषेक केला. त्यानंतर महाराजांना दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्रचे संपादक अशोकराव कोळेकर, बिपिन मणियार, उल्हास लेले, सुनिल निवळे, उत्तम विभुते, गजानन घट्टे, संतोेष हत्तीकर, दत्ता शिंदे, योगेश तगारे, दत्ता पाटील, दिलीप हेरलगे, दिपक फाटक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जय महादबा परिवारातील भक्तगणांनी प्रत्यक्ष भेटुन दर्शन घेत वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800