श्री आदिनाथ बँकेच्या व्हा.चेअरमन पदी श्री.चंद्रकांत पारीसा मगदूम यांची बिनविरोध निवड.
इचलकरंजी:
येथील श्री आदिनाथ को ऑप बँक लि. इचलकरंजी या बँकेच्या रिक्त झालेल्या व्हा. चेअरमन पदासाठी ची निवड गुरुवार दि.०५.०६.२०२५ रोजी मा.डॉ. दिपा पाटील, सहाय्यक निबंधकसो, सहकारी संस्था अधिन, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात होवून *मा.श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम* यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. सदर निवडीकरीता संचालक मा. श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी व्हा. चेअरमन पदासाठी श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम यांचे नांव सुचविले तर त्यास संचालक मा. श्रेणिक दादासो मगदूम यांनी अनुमोदन दिले.
सभेमध्ये अध्याक्षी अधिकारी डॉ. दिपा पाटील तसेच बँकेचे चेअरमन यांचेकडून नूतन व्हा. चेअरमन यांचा सत्कार करणेत आला व उपस्थित संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे अध्याक्षी अधिकारी यांचा संचालिका सौ. मंगल देवमोरे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
सुरूवातीस सभेचे अध्यक्ष व उपस्थित संचालकांचे स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जे.ए. उपाध्ये यांनी केले.
बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षि मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (दादा) व लोकप्रिय आमदार प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमिच लाभले आहे.
सत्कार प्रसंगी व्हा.चेअरमनसो यांनी आपल्या मनोगतात आपली बँक सक्षम असून पुर्वी पासून गुणवत्ता पूर्ण कामकाज करते तसेच पुढील काळात ही करणार असलेची ग्वाही दिली. तसेच बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.
सदर सभेस बँकेचे चेअरमन मा. सुभाष काडाप्पा, संचालक कुंतिलाल पाटणी, राजू उर्फ अभयकुमार मगदूम, मधुकर मणेरे, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरूनाथ हेरवाडे, सुकुमार पोते. संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले उपस्थित होते.
शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जे.ए. उपाध्ये यांनी सर्वांचे आभार मानले.
Advt
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







