ICHMH51NEWS.IN
9921600800

सर्व्हाइकल कॅन्सर मोफत लसीकरण शिबीरात २२० युवतींना लस,माहेश्‍वरी सभेच्या प्रत्येक कार्यात आपले सहकार्याचे गिरीराज मोहतांचे आश्वासन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व्हाइकल कॅन्सर मोफत लसीकरण शिबीरात २२० युवतींना लस,माहेश्‍वरी सभेच्या प्रत्येक कार्यात आपले सहकार्याचे गिरीराज मोहतांचे आश्वासन

इचलकरंजी –
मुली आणि महिलांमध्ये  वेगाने पसरत चाललेल्या सर्व्हाइकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी श्री बांगड माहेश्‍वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी आणि इचलकरंजीतील प्रसिध्द उद्योगपती गिरीराज मोहता यांच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब व कोल्हापुर जिल्हा माहेश्‍वरी युवक संघटना यांच्या वतीने २२० युवतींना तिसर्‍या डोसचे लसीकरण इचलकरंजी येथील शिबीरात करण्यात आले. यानिमित्ताने कोल्हापुर जिल्ह्यात सर्व्हाइकल कॅन्सरचा तिसर्‍या आणि अंतिम लसविषयी अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले.
यावेळी गिरीराज मोहता, सौ. निला मोहता, महाराष्ट्र प्रदेश संविधान समिती प्रमुख अंजनीकुमार मुंदडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी युवक संघटनेचे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल, प्रदेश माहिती प्रसारण मंत्री मुकेश खाबाणी, अ. भा. महासभा कार्यसमिती सदस्य भिकुलाल मर्दा, प्रदेश कार्यसमिती सदस्य शांतिकिशोर मंत्री, महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा, जिल्हा सभा माजी अध्यक्ष चंदनमल मंत्री, डॉ. एस. पी. मर्दा, महेश क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश चाडंक, इचलकरंजी तहसील अध्यक्ष रामगोपाल मालाणी,   यांची प्रमुख उपस्थिती होते.
प्रारंभी स्वागत प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत मंत्री यांनी केले. प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभचे अध्यक्ष नितीन धुत यांनी लसीकरणाची माहिती दिली. या शिबीरासाठी डॉ. मोहिनी धुत आणि डॉ. राहुल चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
Advt
प्रमुख पाहुणे, गिरीराज मोहता यांनी, माहेश्‍वरी सभेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा सााजिक उपक्रमांसाठी  आपले सदैव सहकार्य राहिल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी  राजाराम चाडंक, रामनिवास मुंदडा, लक्ष्मीकांत मर्दा, श्याम मुंदडा, प्रेमराज लोहिया, सतिश काबरा, दिनेश बिडला,  राधेश्याम भूतडा, धनराज डालिया, संजय सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोल्हापुर जिल्हा युवा संघटनेचे  अध्यक्ष आनंद बांगड,सचिव कृष्णकांत भूतडा, मुरली हेडा, विनय बाल्दी, जिल्हा सभेचे सुशील इनाणी, सुरेंद्र हेडा, शिवप्रसाद तापडिया तसेच जिल्हा युवक संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.
या कार्या त बांगड ट्रस्ट चे उपाध्यक्ष रामपाल जी सोनी सचिव राधेश्याम जी सोमाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी व मंत्री सत्यनारायण सारडा यांचे मोला चे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
सम्पूर्ण शिबीरा चे नियोजनबद्ध संचालन जिला सभा सचिव लालचंद गट्टाणी व युवा संगठन सचिव कृष्णकांत भूतडा यांनी केले.
फोटो – लसीकरण शिबीरप्रसंगी गिरीराज मोहता, अंजनीकुमार मुंदडा, नितीन धुत, द्वारकाधिश सारडा, श्रीकांत मंत्री, विनित तोष्णीवाल, लालचंद गट्टाणी, ओमप्रकाश चांडक आदी मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा