ICHMH51NEWS.IN
9921600800

आ.राहुल आवाडेंनी केली बांधकाम कामगारांची सोय,साहित्य इचलकरंजीतच उपलब्ध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आ.राहुल आवाडेंनी केली बांधकाम कामगारांची सोय,साहित्य इचलकरंजीतच उपलब्ध.

इचलकरंजी-
हातकणंगले व शिराेळ या दाेन्ही तालुक्यातील तब्बल 22 हजार बांधकाम कामगारांना आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीतच गृहाेपयाेगी वस्तू व अत्यावश्यक संच उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे बांधकाम कामगारांचा वेळ आणि पैशांची बचत झाल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त हाेत आहे.
विशेष म्हणजे आमदार राहुल आवाडे यांनी बांधकाम कामगारांसाठी महिनाभर राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे व्हेरीिफकेशनसाठी शिबीर भरवून बांधकाम कामगारांना टाेकन नंबर दिले हाेते. यापूर्वी बांधकाम कामगारांना साहित्य आणण्यासाठी काेल्हापूर याठिकाणी जावे लागत हाेते. त्यामुळे त्यांना वेळ आणि पैसा दाेन्हीकडून त्रास सहन करावा लागत हाेताे. मात्र आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून आता बांधकाम कामगारांना सर्व साहित्य इचलकरंजीतच उपलब्ध झाले आहे.
त्या अनुषंगाने श्रीमंत ना. बा. घाेरपडे नाट्यगृह याठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नाेंदीत कामगारांना नवक्रांती बांधकाम कामगार युनियनच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून गृहाेपयाेगी वस्तू व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यावेळी आमदार आवाडे यांनी भविष्यातही बांधकाम कामगारांना येणाèया अडीअडचणी व समस्या साेडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.
Advt
स्वागत रमेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकात नवक्रांती बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष बंडाेपंत सातपुते यांनी बांधकाम कामगारांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कार्याध्यक्ष प्रमाेद पाेवार व मदन मुरगुडे यांनी मनाेगत व्यक्त केले.
याप्रसंगी महावीर जैन, श्रीशेल कित्तुरे, अनिल कांबळे, शंकर नंदरगी, हर्षद सातपुते, सत्यजित निंबाळकर, साै. मनीषा नाईक, साै. संगीता सिंग, साै. उर्मिला सरवदे, साै. स्वाती जाधव, सादिक खलिा, अनिल जाधव, सचिन बिरंजे, साै. ऐश्वर्या हजारे, आदम मुल्ला यांच्यासह बांधकाम कामगार माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा