दीपक शिंदे इचलकरंजीचे नवे प्रांताधिकारी; मोसमी चौगुले यांची करवीरला बदली
इचलकरंजी :
सांगली येथील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांची इचलकरंजीच्या प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याच्या इचलकरंजी प्रांताधिकारी मोसमी चौगुले बर्डे यांची बदली करवीर (कोल्हापूर) येथे करण्यात आली आहे.या बदलासंदर्भातील आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय फेरबदलाच्या या निर्णयामुळे दोन्ही ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांकडून कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







