मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची ‘इचलकरंजी नागरिक मंच’ची मागणी
इचलकरंजी :
शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास गंभीर होत असून, मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यांमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार ‘इचलकरंजी नागरिक मंच’ने केली आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना शहरात स्वतंत्र झोनमध्ये स्थलांतरित करावे,व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मंचच्यावतीने नगरपथविक्रेता समितीच्या अध्यक्षा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या शहरात सुमारे ४०० मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करत आहेत. चिकन ६५, बिर्याणी यासारख्या पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याने या भागांमध्ये कुत्र्यांचा वावर वाढतो, ते आक्रमक होतात व नागरिकांवर हल्ले करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र झोनची आवश्यकता आहे, असे निवेदनात नमूद आहे.
Advt
हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आले असून, यावेळी ‘इचलकरंजी नागरिक मंच’चे प्रतिनिधी राजू पारीक, राजू कोंन्नुर, महेंद्र जाधव, अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते. उपयुक्त परळकर यांनी हा विषय नगरपथविक्रेता समितीच्या पुढील बैठकीत मांडून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
उपायुक्त नंदू परळकर यांना निवेदन देताना राजु पारीक, राजु कोन्नुर,अमोल मोरे व महेंद्र जाधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







