शहापूर येथे नातेवाईकांकडून ट्रक ड्रायव्हरवर हल्ला; गुन्हा दाखल
शहापूर (ता. हातकणंगले) –
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहापूर गावच्या हद्दीतील माऊली अलायमेंट समोर योगाश्रमाजवळ जुन्या वादातून दोघांनी मिळून एका ट्रक ड्रायव्हरवर फरशीच्या तुकड्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Advt
फिर्यादी गोविंद महेश मुडशी (वय ३३, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) हे भांडण सोडविण्यास गेले असता आरोपी बाळकृष्ण गुंडला याने पाठीमागून फरशीच्या तुकड्याने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. तर दुसरा आरोपी विनायक गुंडला याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर दोघांनी मिळून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक वडगावे यांनी फिर्यादी घेतली आहे तर तपास पोहेकॉ. मोहिते करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







