पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सर्वसाधरण सभा खेळीमेळीत संपन्न
इचलकरंजी –
येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिंक सर्वसाधरण सभा समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी शिवगोंडा खोत होते
यावेळी बोलताना खोत म्हणाले पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना ही विक्रेत्याच्या एकजुटीवर उभी असून आज संघटना प्रत्येक निर्णय हा विक्रेत्याच्या भविष्याचा विचार करुन घेत असून यामधूनच आपण येणार्या अडचणीवर मात करित पुढे जात आहोत यापुढे देखील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात कायम स्वरूपी स्थिरता यावी यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वीत व्हावे यासाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रा मधील सर्व तालुका पदाधिकारी यांची बैठक घेणार आहे असे सांगितले .
Advt
यावेळी सचिव अण्णा गुंडे यांनी संघटनेच्या विक्रेत्यांच्या विविध सुचनाचे निरसन करून भविष्यात संघटनेची आर्थीक स्थिती कशी मजबूत केली जाईल यांची माहिती दिली.यावेळी संघटनेला सहकार्य केल्याबद्दल बलराम भोजणे,मिलिंद वेदपाठक,मनोज खेतमर व अतुल मुंसडी यांचा सत्कार करण्यात आला.
Advt
यावेळी संघटनेचे खजिनदार नारायण शिंदे यांनी नोटिस व विषयांचे वाचन केले व सर्व विषय एकमताने मंजूर करुन घेतले.श्रध्दांजलीचे वाचन सुरेश चौगुले यांनी केले तर अभिनंदनाचा ठराव कृष्णा हजारे यांनी मांडला सुत्रसंचलन शिवानंद रावळ यांनी केले तर स्वागत महेश बावळे यानी केले शेवटी आभार अमर मुंसडी यांनी मानले सभेला मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते बंधू उ
उपस्थितहोते.
पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वार्षिक सर्व साधरण सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष शिवगोंडा खोत तर व्यासपीठावर अण्णा गुंडे,शिवानंद रावळ,सुरेश चौगुले ,अमर मुंसडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







