ICHMH51NEWS.IN
9921600800

महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांची पॉवरलूम असोसिएशनला भेट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांची पॉवरलूम असोसिएशनला भेट

इचलकरंजी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे इचलकरंजी विभागाचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.एस. हाथोळकर व प्रसाद अवघडे, उपकार्यकारी अभियंता एस.बी. चौगुले, उपव्यवस्थापक एस.बी.गोसावी हे उपस्थित होते.

 

दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोंदिल यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती देऊन महावितरण व पॉवरलुम असोसिएशन यांच्यातील यापूर्वीचे संबंध व सहकार्य अशाचप्रकारे आपल्याकडून पुढे चालू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शहापूर, तारदाळ, खोतवाडी, आमराई मळा येथील सबस्टेशन अद्याप सुरू झालेले नाही, नविन सबस्टेशन जागेची उपलब्धता, आवाडे सबस्टेशन महापूरात पाण्याखाली जाते त्यामुळे त्याची ऊंची वाढविणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, मागेल त्याला त्वरीत वीज कनेक्शन मिळणे, यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याजाची रक्कम कमी करणे, पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न, वीज ग्राहकांच्या गाडी पार्कीगसाठी सोय, इचलकरंजी व परिक्षेत्रासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, लॅडर व्हेईकल, तीन शिफटमध्ये कर्मचारी, पुर्वीप्रमाणे मागेल त्याला मल्टीपार्टी व एकाच शेडमध्ये अनेक कनेक्शन मिळावे, स्मार्ट मिटर व प्रिपेड मिटर, मेंटनन्स व साहित्य, इचलकरंजीच्या महावितरण कंपनीची प्रतिमा उंचावणे इ. प्रश्न उपस्थित करून यामध्ये आपण स्वत: लक्ष घालून यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा म्हणून विनंती केली.

Advt

यावेळी कार्यकारी अभियंता गोंदिल यांनी उपस्थित संचालक व यंत्रमागधारक यांनी मांडलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या प्राधान्याने दूर करून यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध जास्तीत जास्त दृढ करण्याचे प्रयत्न होतील असे आश्वासन दिले व यंत्रमागधारकांनी महावितरणला पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Advt

यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, प्राईड इंडया पार्कचे चेअरमन सुरेश आमासे यांच्यासह प्रतिष्ठीत कारखानदार उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा