दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून महिलांना अध्यात्मिक संधी, समाजोपयोगी उपक्रमांची सांगड
इचलकरंजी
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अध्यात्माची नवी दिशा आणि समाजाला आधार देणारा सेवाभाव हेच या चळवळीचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक चे चंद्रकांत दादा मोरे यांनी केले अध्यात्मिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा मोरे हे इचलकरंजी सेवा केंद्रामध्ये आले होते यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले,
Advt
ते म्हणाले दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून देशभर अध्यात्मिक क्रांती घडविण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. या मार्गातून केवळ भक्तिभाव नव्हे तर समाजोपयोगी कार्यांनाही विशेष प्राधान्य दिले जाते. विशेषतः महिलांना अध्यात्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून, विविध पूजन, नामस्मरण, ध्यानधारणा, साधना वर्ग, तसेच आध्यत्मिक सेवांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो,या सेवा मार्गामार्फत सामाजिक उपक्रमांनाही चालना मिळते. व्यसनमुक्ती अभियान, बालसंस्कार शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अन्नदान सेवा आयुर्वेद, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता, अशा विविध उपक्रमांमधून समाजप्रबोधन व सेवाभाव जागविला जातो. या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लाखो कुटुंबे या सेवेमध्ये सहभागी होत आहेत. संपूर्ण देशभरात आणि परदेशात आठ हजारहून अधिक केंद्रात १५ कोटी सेवेकरी या सेवा मार्गाशी जोडले गेले आहेत,मानवीय जीवनातील समस्या, अडचणी, मानसिक तणाव, व्यसनाधीनता अशा बाबींचे विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रांतून करण्यात येते. धार्मिकतेबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत अध्यात्मिक मार्गदर्शन दिले जात आहे.
Advt
राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये देखील सेवा मार्गाची सशक्त काम करत आहे. एकवटलेली ऊर्जा, अनुशासन, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन ही या चळवळीची बलस्थाने ठरत आहेत. नदीवेस येथील सेवा केंद्र पार पडलेल्या या कार्यक्रमा वेळी इचलकरंजी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच हजारो भाविक सेवेकरी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








