खासदार धैर्यशील माने आणि नगरसेवक रणजीत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून युवकाचे ४०,०००/- चे ऑपरेशन विनामूल्य!डॉ. लांडे हॉस्पिटल, इचलकरंजी यांचे विशेष सहकार्य
हातकणंगले
हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी अमित चौगुले आणि रवी चौगुले यांचे भाचे विश्वजीत सर्जेराव शिंदे (वय १९, रा. अतिग्रे) याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाच्या टाचेतील लिगामेंट पूर्णतः तुटले होते आणि शस्त्रक्रियेशिवाय चालणे अशक्य होते.
मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने ४०,०००/- इतक्या खर्चाचे ऑपरेशन करणे कुटुंबाला शक्य नव्हते. शासकीय योजनांतून मदत मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न झाले, परंतु टाळाटाळ होत होती. अशा कठीण प्रसंगी अमित चौगुले यांनी नगरसेवक रणजीत पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. नगरसेवक पाटील यांनी तत्काळ खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर मांडले.
खासदार माने व नगरसेवक पाटील यांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करून डॉ. लांडे हॉस्पिटल, कोल्हापूर रोड, इचलकरंजी येथे शासकीय योजनेअंतर्गत ऑपरेशन विनामूल्य करण्याची व्यवस्था केली.यासाठीडॉ. आशुतोष लांडे व लांडे हॉस्पिटल प्रशासन,शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्रदादा माने,शिवसेना गटनेते व माजी सरपंच अजितसिंह पाटील (काका),भूषण पाटील, राहुल इंगवले व विलास यळगुडे यांचे सहकार्य लाभले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







