ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेएएससी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेएएससी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

          इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँन्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी या महाविद्यालयामध्ये  २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या  व महाविद्यालयाच्या एनसीसी व क्रीडा  विभागांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, योगा प्रशिक्षक मा. मुग्धा ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली  एनसीसी कॅडेट, विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक यांच्यासह उपस्थितांनी योगासने केली. प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘वन अर्थ वन हेल्थ’ याबाबत माहिती देत योगाचे महत्त्व, बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य व स्वास्थ्य यासाठी योग व प्राणायाम यावर भाष्य करत सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
          मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी विभाग प्रमुख प्रा. लेफ्ट. विनायक भोई यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रा. व्ही. पी. पाटील, प्रबंधक श्री. आर. बी. जोग, क्रिडा संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले, एन एस एस विभाग प्रमुख प्रा. व्ही.एस. ढोबळे यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Advt
यावेळी ५६ महाराष्ट्र बटालियन चे सी.ओ. मा. पुनीत गोगिया यांच्या मार्गदर्शनानुसार १९,२० व २१ जून या तीन दिवसात संपन्न झालेल्या योगा कॅप्सूलचा समारोप  मा. प्राचार्य डॉ. एस. के. खाडे आणि योगा प्रशिक्षक मा. सुहास पोवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा