ICHMH51NEWS.IN
9921600800

दि इचलकरंजी बार असोसिएशन व विधी सेवा समिती तर्फे योग दिन साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दि इचलकरंजी बार असोसिएशन व विधी सेवा समिती तर्फे योग दिन साजरा

इचलकरंजी
दि इचलकरंजी बार असोसिएशन, इचलकरंजी व हातकणंगले तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
जिल्हा व सत्र न्यायाधिशसा मा. एम.ए. भोसलेसोो व प्रसिद्ध योग शिक्षक सुहास पोवळे सर यांचे प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी सुहास पोवळे सर यांनी प्रात्यक्षिकासह योग विषयी सविस्तर माहिती दिली. मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसोो मा. एम.ए. भोसलेसोो यांनी वकिलांचे आयुष्यात वेळेचे नियोजनाचे महत्व सांगून वकिलांनी व्यावसायिक ताणतणावातून मुक्त राहणेसाठी नियमीत योग व व्यायाम करणे आवश्यक असलेबाबत मार्गदर्शन केले.
Advt
यावेळी इचलकरंजी नगरपालिकेचे सिनिअर अॅड. शिवाजीराव बावडेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधिशसोो मा. एम.ए. भोसलेसोो यांचे स्वागत केले. योग शिक्षक सुहास पोवळे यांचे स्वागत मा. जिल्हा न्यायाधिशसो श्री. भोसले साहेब यांनी केले. यावेळी सुहास पोवळे यांचा परिचय वरिष्ठ अॅड. मंजुषा पोटे यांनी केले. अॅड. सौ. पुर्वा अनुराग कुलकर्णी यांनी नियमीत योग करणेचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. दिपाली हणबर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजनासाठी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशसो के.बी. अग्रवाल मॅडम, मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसोो श्री. जे.एल. गांधी, कोर्ट मॅनेजर खाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व इचलकरंजीतील न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. अदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड, राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, विधी सेवा समितीचे श्री. ज्ञानेश्वर मिरजकर, प्रविण फगरे व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
योग प्रशिक्षक सुहास पोवळे यांचे स्वागत करताना बार असोसिएशनचे सदस्य
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा