डी.के.टी.ई. च्या प्रा. व्ही. बी. मगदुम यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी :
येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा.व्ही.बी.मगदुम यांना विश्वेश्वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळागांवी यांचेकडून पी.एच.डी. इन मेकॅनिकल इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा व्ही.बी. मगदुम हे गेली १४ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत.
Advt
त्यांनी ‘मॉडेलिंग ऍण्ड ऑप्टीमायझेशन ऑफ लेजर मशिनिंग प्रोसेस बाय कन्वेंनशनल रिग्रेशन ऍण्ड सॉफट कम्प्युटेशन मेथड’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी त्यांना केएलएस गोगटे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. जे.के. कित्तुर यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक, प्रा. डॉ.ए.के. घाटगे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800