इचलकरंजीत आणीबाणी काळात बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार
इचलकरंजी:
भारतात दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात बंदीवास सोसलेल्या व्यक्तींचा केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार सन्मान करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील अशा ३५ हून अधिक नागरिकांचा गौरव करण्यात आला.
Advt
या विशेष कार्यक्रमात आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दिपक शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, सहायक आयुक्त संतोष जिरगे, विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला.
श्रीवल्लभ मर्दा, पांडुरंग देवर्डे, संपतकुमार मालु, कृष्णा सातपुते, विमल पंचनदीकर, सिताराम ओझा, रघुनाथ जोशी, मिनाक्षी ओझा, सुवर्णा पाटील, दत्तात्रय जोशी, नारायण आपटे, विजय देवळे, तमान्ना तेली, तसेच स्व. गजानन बडवे, प्रताप होगाडे, रवींद्र दुधाने (मयत) यांच्यासह इतर अनेक मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
Advt
याप्रसंगी आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक क्षणांचे छायाचित्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी सभापती किसन शिंदे, मनोज हिंगमिरे,अमृता भोसले, दिपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंदीवास भोगलेल्या सेवकांचा सत्कार करताना आ.राहुल आवाडे,सुरेश हाळवणकर,पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







