ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त यंत्रसामग्रीसह शोभायात्रा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त यंत्रसामग्रीसह शोभायात्रा उत्साहात संपन्न

महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पारंपरिक पोशाख, विभागीय सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

या शोभायात्रेमध्ये अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून सुरू झालेली ही शोभायात्रा शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरून जात पुन्हा कार्यालयात समारोप झाली. मार्गामध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, रसना कॉर्नर, नाट्यगृह चौक, चांदणी चौक, संभाजी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता.

शोभायात्रेत महापालिकेच्या विविध विभागांनी आपापल्या सेवांचे डिजिटल फलक, सजवलेली वाहने आणि सांस्कृतिक सादरीकरण सादर केले. अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाची अत्याधुनिक वाहने, लेखा विभागाचे छत्रपती शाहू महाराज साकारलेले वाहन, वासुदेव वेशातील कर्मचारी, ग्रंथालय विभागाकडून शिक्षणाचे संदेश देणारे सादरीकरण नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

नगर रचना विभागातर्फे मुलींनी कथक नृत्य सादर केले. अल्फोंसा स्कूलच्या बँड पथकाने तसेच सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना भारावून टाकले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, संत गाडगेबाबा अशा ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिमत्त्वांचे वेश परिधान करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुरुष कर्मचारी पारंपरिक कुर्ता-पायजमा व फेटा तर महिला कर्मचाऱ्यांनी नऊवारी साडी व फेट्यात सहभागी होत पारंपरिकतेची झलक दाखवली. काही विभागांनी वाद्यवृंद, हालगी आदींचा वापर करत शोभायात्रेत सजीवता आणली.

शोभायात्रेतून इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध सेवा, कार्यपद्धती आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी परिचय शहरवासियांना मिळाला.

मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले यंत्रसामुग्रीचे सादरीकरण

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा