ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत घरफोडीची घटना – ४४ हजारांचा मुद्देमाल चोरीला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत घरफोडीची घटना – ४४ हजारांचा मुद्देमाल चोरीला

इचलकरंजी  :
चौगले चाळ, गावभाग विठ्ठल मंदिर परिसरात एका नागरिकाच्या राहत्या घरात घडलेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ४४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किरण राधाकीसन तिवारी (वय ५२, रा. चौगले चाळ, गावभाग विठ्ठल मंदिर, इचलकरंजी) हे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी हैदराबाद येथे त्यांच्या बहिणीकडे गेले होते. या कालावधीत, दिनांक २७ जून ते ४ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीच्या मूर्ती, पितळी व जर्मनची भांडी, इन्व्हर्टर बॅटरी, हँडमिक्सर व रोख रक्कम मिळून एकूण अंदाजे ४४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार नन्नवरे हे करीत असून, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा