श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेमध्ये ८% डिव्हिडंड जाहीर – चेअरमन सुभाष काडाप्पा
इचलकरंजी,
इचलकरंजी येथील श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि.ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा होते.
सुरुवातीला भगवान आदिनाथ व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून सहकार महर्षी मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), माजी मंत्री प्रकाश आवाडे (आण्णा), आमदार डॉ. राहुल आवाडे आदींची उपस्थिती लाभली होती.
Advt
संचालक श्रेणिक मगदूम यांनी स्वागत तर मधुकर मणेरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी नोटीस वाचन केले. सर्व विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.
चेअरमन सुभाष काडाप्पा यांनी आपल्या भाषणात सन २०२४-२५ साठी ८% डिव्हिडंड जाहीर केला. त्यांनी सांगितले की, आजपर्यंत १ हजार रुपयांच्या शेअरवर २४४० रुपयांपर्यंतचा परतावा देण्यात आला आहे. अहवाल वर्षात बँकेने १ कोटी ७९ लाख ढोबळ नफा व ७७ लाख ७० हजार निव्वळ नफा कमावला.
बँकेने ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ योजनेतून १३५ सभासदांना १८ कोटींचे कर्ज वाटप केले. याशिवाय आयएमपीएस, एटीएम क्यूआर कोड, युपीआय अशा आधुनिक सेवा ग्राहकांना दिल्या जात आहेत.
प्रमुख मार्गदर्शन करताना प्रकाश आवाडे (आण्णा) यांनी बँकेच्या संस्थापकांच्या कठोर शिस्तीचे स्मरण करून बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. सायबर सुरक्षा व तंत्रज्ञान हे छोटे बँकांसमोरील मोठे आव्हान असून, व्यवसाय व नफा वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळप्रमाणे इतर ८ महामंडळांच्या योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा, तसेच महिलांसाठी विशेष योजना राबवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
सभेच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात मा. कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे यांच्यासह नूतन व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम, चेअरमन अभयकुमार मगदूम, संचालक मधुकर मणेरे, शिवाजी पाटील, राजेश पाटील, आदर्श ग्राहक बाळासाहेब बोंद्रे, उत्तम सेवा करणारे कर्मचारी जिवंधर चौगुले, पंकज वसवाडे, महावीर संकाण्णा यांचा समावेश होता.
उत्कृष्ट शाखा म्हणून माणगाव शाखेस ₹११,०००/- रोख व शिल्ड देण्यात आली. पत्रकार श्री. रविंद्र पाटील व श्री. शिवाजी काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
सभेचा समारोप उपाध्यक्ष चंद्रकांत मगदूम यांनी आभार प्रदर्शनाने केला. सूत्रसंचालन तिर्थकर माणगांवे यांनी केले.
फोटो
३० व्या सभेत बोलताना चेअरमन सुभाष काडाप्पा
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







