ICHMH51NEWS.IN
9921600800

स्मार्ट मीटर विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक – मोर्चाद्वारे विजबिलातील वाढीव भार रद्द करण्याची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्मार्ट मीटर विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक – मोर्चाद्वारे विजबिलातील वाढीव भार रद्द करण्याची मागणी

इचलकरंजी

शहरातील कामगार वस्त्यांमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ झाल्याच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) इचलकरंजीने कार्यकारी अभियंता, महावितरण यांना निवेदन देत स्मार्ट मीटर तात्काळ काढून घेण्याची आणि वाढीव बिले माफ करण्याची मागणी केली आहे.

पक्षाचे शहर सचिव कॉ. भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका अदानी समूहाला देण्यात आला असून, त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. वीज ग्राहकांच्या परस्पर संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात असून, यामुळे वीज बिले अवाजवी वाढली आहेत. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक भागात जनतेने प्रतिकार केला आहे. काही ठिकाणी लाल बावट्याच्या माध्यमातून स्मार्ट मीटर हटवले देखील गेले आहेत.

Advt

सरकारकडून १०% सवलतीची घोषणा केली असली तरी वाढलेल्या बिलांच्या तुलनेत ती अत्यल्प असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मार्क्सवादी पक्षाने सर्व स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत,वाढीव वीज बिले रद्द करावीत,अदानी कंपनीचा स्मार्ट मीटरसंबंधीचा ठेका रद्द करण्यात यावा या मागण्या केलेल्या आहेत.या मागण्या १५ दिवसात मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पक्षाने दिला आहे.

या निवेदनावर कॉ. सदा मलाबादे, कॉ. भाऊसो कसबे, कॉ. धनाजी जाधव, कॉ. पार्वती म्हेत्रे, संपदा कोरी, कॉ. यासीन भोई यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोर्चात सहभागी माकपचे कार्यकर्ते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा