एटीएममध्ये हातचलाखीने कार्ड बदलून ४७ हजारांची फसवणूक
इचलकरंजी:
इचलकरंजी एस.टी. स्टँडजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये एका अज्ञात इसमाने दत्तात्रय कुलकर्णी (वय ५८, रा. टाकवडे, ता. शिरोळ) यांची हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून ४७,४४७.६५ रुपयांची फसवणूक केली. १० जुलै रोजी ही घटना घडली १२ जुलै रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने मदतीच्या बहाण्याने पिन जाणून घेत फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून त्याऐवजी दुसरे कार्ड देत विविध एटीएममधून रक्कम काढली. तपास सहा. फौजदार कसेकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







