शहापूर येथे बंद यंत्रमाग कारखान्यात चोरी १,२० लाखांचा मुद्देमाल लंपास
इचलकरंजी
शहापूर पोलीस ठाणे (इचलकरंजी) येथे फिर्यादी नितीन तानाजी हराळे (वय ३६ रा. धनगर मळा, शहापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १८ जुलै ते २३ जुलै २०२५ या कालावधीत अहील्यादेवी चौक ते शहापूर रोड लगत असलेल्या बंद बिरदेव टेक्स्टाइल व मंगराया टेक्स्टाइल या यंत्रमाग कारखान्यात अज्ञात चोरट्याने लाकडी दरवाजाचे कडीकोयंडे उचकटून प्रवेश केला.
चोरट्याने पावरलूम यंत्रासाठी लागणारे प्रत्येकी ३०००/- किंमतीचे अशा एकूण ४० अॅक्युवेटर पार्टस, एकूण १,२०,०००/- किंमतीचे साहित्य चोरून नेले. फिर्यादीने याबाबत शोध घेतल्यानंतर तक्रार दाखल केली.शहापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पो.उ. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







