महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५.७३ कोटींचा पाचवा हप्ता जमा
इचलकरंजी
राज्य सरकारच्या निधीतून महापालिकेतील सेवा व निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा व अंतिम हप्ता—एकूण ५ कोटी ७३ लाख रुपये—२९ जुलै २०२५ रोजी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. या निर्णयामुळे २.०६ कोटी रुपये निवृत्तांना व ३.६७ कोटी रुपये सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार, लोकप्रतिनिधी, आयुक्त पल्लवी पाटील व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







