शशांक बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड
इचलकरंजी, –
२०२१ पासून काँग्रेस सचिवपदी कार्यरत असलेल्या शशांक बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने व जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांच्या घोषणेनुसार झाली. संघटन कौशल्य आणि कामगिरीच्या आधारावर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
Advt
सिंधुदूर्ग-रत्नागिरी निरीक्षक, कोकण पदविधर निवडणूक समन्वयक, तसेच कर्नाटक निवडणूक प्रचारात सहभाग यासह विविध भूमिकांतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सरचिटणीसपद बहाल झाले. बावचकर यांनी १९८१ पासून विद्यार्थी संघटनेतून काम सुरू केले असून,१० वर्षे नगरसेवक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले आहे. त्यांच्या निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







