पाण्याच्या प्रश्नावरुन विनोद कोराने यांचे आजपासून बेमुदत उपोषण.
तारदाळ:
तारदाळ व खोतवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता, अपूर्ण कामे व पाण्याच्या तुटवड्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद दत्तात्रय कोराणे हे आजपासून ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
Advt
श्री.कोराणे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाने सुमारे ५२ कोटी रुपये खर्च करून साकारलेली ही योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली असून, उन्हाळ्यात ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळाले नाही. उलट कामाच्या निमित्ताने रस्ते उकरून ठेवले गेल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे.मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही योजना अपयशी ठरली असून, त्यांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आजपासून ग्रामपंचायत समोर कायद्याच्या चौकटीत राहून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पत्रकार परिषदेस सुनील पाटील,उदय दुधाणे, उत्तमसिंग चव्हाण, योगेश डफळे,अनिकेत चव्हाण उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विनोद कोराने व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







