ICHMH51NEWS.IN
9921600800

यंत्रमाग व्यवसायास लागेल त्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध-माजी मंत्री प्रकाश आवाडे.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यंत्रमाग व्यवसायास लागेल त्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध-माजी मंत्री प्रकाश आवाडे.

इचलकरंजी
यंत्रमाग व्यवसायासाठी लागेल त्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून यंत्रमाग धारकांनी प्रामाणिक पणे स्पर्धात्मक युगात योग्य अर्थार्जन करत व्यवसाय करावा असे मत पॉवरलूम असोसिएशनच्या ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.
 इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा असोसिएशनच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकात चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी वस्त्रोद्योगाची परिस्थिती विशद करताना इचलकरंजीला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यामुळे गारमेंट सिटी, हायटेक सिटी नंतर आता एक्स्पोर्ट सिटी बनवण्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन तिर्थंकर माणगांवे यांनी केले विषयपत्रिका वाचन सेक्रेटरी  एस. डी. जोशी यांनी केले. सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत, सन २०२४-२५ चा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, ऑडिट रिपोर्ट, खर्चाचे अंदाजपत्रक, लेखापरीक्षकांची नेमणूक यांसह एकूण ८ विषयांवर चर्चा होऊन सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे लघुलेखकपदी निवड झालेल्या कु. तेजस्विनी करजगार यांचा गौरव  प्रकाशराव आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांनी मार्गदर्शन करताना इचलकरंजीला “एक्स्पोर्ट सिटी” बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. “हायटेक गारमेंट्स नंतर सोलर सिटी आणि आता वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठण्याचे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले. सोलर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सामूहिक प्रोत्साहन योजनेतील त्रुटी पूर्ततेसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळवली आहे. ४.९० रुपये शटललेस व २.७५ रुपये साध्या यंत्रमाग मजुरीमुळे उद्योजकांनी मल्टी पार्टी कनेक्शन करून गैरमार्गाने सवलत घेतल्याने शासनदरबारी अडचणी येत असल्याचे सांगितले. स्पर्धा  वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. “साडीची मजुरी ५५० इतर ठिकाणी असताना इचलकरंजीत ४२५ असल्याने  आपणच आपले नुकसान करून घेत आहोत मजुरी एकसमान ठरवली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. वीज दर २० वर्षे स्थिर ठेवण्याचा प्रस्ताव असून, सोलर कनेक्शन दोन वर्षांत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी संचालक  पांडुरंग दत्तू सोलगे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.कार्यक्रमास सुनील पाटील, शशिकांत मोहिते, राजगोंडा पाटील,विश्वनाथ अग्रवाल, दीनदयाल झंवर, गुंडप्पा रोजे यांच्यासह असोसिएशनचे उपाध्यक्ष
महंमदरफिक  खानापुरे, संचालक सतीश कोष्टी,सोमा वाळकुंजे,चंद्रकांत भोपळे, सुभाष बलवान,दत्तात्रय टेके,किरण पोवार, राजाराम गिरी, हमिदा बाबुराव गोरवाडे,महादेवी खोत,सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 इचलकरंजी वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळणार असून, भविष्यातील औद्योगिक दिशादर्शक ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पॉवरलूम असोसिएशन सभेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे,समोर उपस्थित सभासद
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा